धक्कादायक ! अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  अकोले तालुक्यातील येसरठाव येथे एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आले आहे. त्याचा कुणीतरी खून केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत अकोले पोलिसांत ज्ञानेश्वर कोडींबा ठोगिरे रा.येसरठाव यांनी फिर्याद दिली असुन यात त्यांनी म्हटले आहे की, २१ मार्च २०२१ रोजी

सकाळी पासोडी नावाच्या शेतात २५ ते ३० वर्षे वयाचे तरुणाचा मृतदेह धारदार शस्ञाने मारुन अर्धवट जाळुन टाकलेल्या अवस्थेत आढळुन आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दिपक ढोमणे सहकार्यासह घटनास्थळी जावून चाैकशी पंचनामा केला. अज्ञात इसमानी धारदार शस्ञाने मारून टाकून

त्यास अर्धवट जाळुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दिपक ढोमणे करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24