अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे अनेक ठिकाणी मृतदेह आढळून आल्याच्या घटना यापूर्वीही जिल्ह्यात घडल्या आहेत.
यातच पुन्हा एकदा अशीच एका धक्कादायक घटना जिल्ह्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेवासा तालुक्यातील सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात एकाच मृतदेह आढळून आला आहे.
दत्तू किसन शिंदे (वय 40) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान नदीपात्र परिसरात हा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देऊन पाहणी केली. नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनई पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास हवालदार एच. एम गर्जे करत आहेत.