अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- एका इसमाचा खून करून प्रेत रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊसाच्या शेताजवळ आणून टाकल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे घडली आहे. बाबु छबु निकम असे मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती मिळते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळगाव थडी शिवरस्त्यावर संजय दामोदर निकम यांच्या ऊसाच्या बांधाला बाबु छबु निकम नामक इसम आपल्या मोटारसायकलसह बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळून आला.
याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.पोलीस पाटील संजय वाबळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता बाबू निकम शेताच्या कडेला पडलेला होता व त्याच्या शेजारी दुचाकी पडलेली आढळून आली.
दरम्यान या घटनेची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.