अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- शेतामध्ये ऊस तोड सुरू असताना ऊसतोड कामगारांनाएका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथे घडली आहे.
याबाबत ऊसतोड कामगारांनी संबंधित क्षेत्र मालक परसराम आसाराम गायधने यांना कळवले. या घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास कळवण्यात आली. पोलिस घटनास्थळी दखल झाले व त्यांनी पाहणी केली.
परिसरातील नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीचा मृतदेह ओळखीचा आहे का? यासंदर्भात माहिती घेतली. यावेळी गावातील गोरक्षनाथ गंगाधर मोरे (वय 65) हे दोन ते तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे.
यासंदर्भात श्री. एकनाथ मोरे यांनी श्रीरामपूर पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल केली होती. यावरून पोलीस नाईक संंजय दुधाडे यांनी नातेवाईकांना मृतदेह
दाखविताच सदर मृतदेह हा आमच्या वडिलांचा असल्याबाबत एकनाथ मोरे यांनी माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे हलविण्यात आला आहे.