अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून तरूणाचा निर्घृण खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडत आहे. खून, हत्या, मारहाण , अशा घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. आता पुन्हा एका प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

राहाता तालुक्यातील लोणी येथे इरिगेशन परिसरामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असता सदरचा मृतदेह हा अर्जुन अनिल पवार (वय २५,रा बारागाव नांदूर) याचा असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान या प्रकरणी दीपक डोळस व विठ्ठल कावळे (दोघे रा.राहूरी) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे एपीआय समाधान पाटील करत आहेत . अवघ्या तीन तासात कुठलाही पुरावा नसताना गुन्ह्याचा तपास करण्यात लोणी पोलीस स्टेशनला यश आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24