अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- चार दिवसापुर्वी तालुक्यातील ब्राम्हणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता झालेल्या साडेचार वर्षाच्या मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सदर लहान मुलगी बेपत्ता झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु आज सदर मुलीच्या मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली. खुद पोटच्या पोरीला बापानेच विहिरीत फेकुन दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
ब्राह्मणी -जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासुन ‘एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला आहे.
शुक्रवारी मध्यरात्री पासून मुलगी ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीतून बेपत्ता होती. शनिवारी कुटुंबीयांनी दिवसभर तपास केला शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला.
रविवारी सकाळपासून श्रीरामपूर पोलीस विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके व पोलिस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्यासह नगरमधील पोलीस पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते .
दरम्यान, सोमवारी सकाळी ब्राम्हणी गावातच वांबोरी रोड लगत एका विहीरीत बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. दारूच्या नशेत केले कृत्य सदर मुलीचा बाप हा ऊस तोडणी कामगार असून
दररोज तो दारू पिऊन आपल्या बायकोशी भांडायचा, घटनेच्या दिवशीही हा ऊस तोडणी कामगार प्रचंड दारू पिलेला होता. दारूच्या नशेत त्याचे बायकोशी कडाक्याचे भांडण झाले.
याच कडाक्याच्या भांडणाच्या दरम्यान दारूच्या नशेत आपल्याच साडेचार वर्ष वयाच्या मुलीला या ऊस तोडणी कामगाराने विहिरीत फेकून दिले,
अशी माहिती डिवायएसपी संदीप मिटके यांनी दिले आहे. याबाबत शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मुलीच्या मृत्यूचे कारण पुढे येईल, असे राहुरीचे पोनि हनुमंत गाडे यांनी सांगितले.