धक्कादायक ! कोरोनाने हिरावून नेले दोन सख्ख्या भावांचे प्राण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार केला आहे. यामुळे दरदिवशी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे अनेकांचे प्राण देखील गेले आहे.

यातच कर्जत तालुक्यातील दोन सख्य्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिद्धटेकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

कर्जत तालुक्यातील सिध्दटेकमध्ये एकाच कुटुंबावर कोरोनाचा आघात होऊन दोन सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

संतोष तुकाराम चौगुले (वय ३५) व सुभाष तुकाराम चौगुले (वय ३२) अशी कोरोनाने मृत्यू झालेल्या दोन भावांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष चौगुले हे पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. २५ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

सुभाष चौगुले यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बारा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान मयत दोन्ही भावांमधील संतोषला तीन वर्षाची १ मुलगी आहे तर सुभाषला एक पाच वर्ष वयाची व दुसरी दहा महिन्याची मुलगी आहे.

या दोघांच्या मृत्यूने या लेकरावरील बापाचे छत्र हरपले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिद्धटेकसह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24