अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-माल घेऊन जाणार्या ट्रक चालकांना नगरमध्ये अज्ञात चोरटयांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मालेगाव येथून बाजरीचे पोते घेऊन दोन मालट्रक कुरकुम, दौंडकडे निघाले होते.
कोल्हारजवळ नगर – मनमाड महामार्गावर एका हॉटेलजवळ मालट्रकचा टायर पंक्चर झाला.
टायर बदलत असताना कोल्हारकडून ५ अनोळखी चोरट्यांनी हातातील कोयत्याने वार करून ट्रक ड्रायव्हरकडील रोख रक्कम व मोबाईल दरोडा टाकून चोरून नेले.
दरम्यान याबाबतची माहिती लोणी पोलिसांना मिळताच मोठ्या शिताफीने पाठलाग करून निर्मळ पिंपरी शिवारात २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
मात्र उर्वरित तिघाजणांनी अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना गुंगारा दिला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.