अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जुन्नर तालुक्यातील मंगरूळ गावामध्ये कुकडी नदी पात्रात दोन तरुण बुडाले होते.
यामध्ये मनसुक मारुती मोरे (वय वर्ष ३९ रा. रांधे ता. पारनेर) याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर त्याचा मोठा भाऊ पोपट मारुती मोरे (वय ४२) याला वाचविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वरील दोघे भाऊ असून पारनेर तालुक्यातील रांधे येथील मूळ राहिबासी आहेत.
यातील मनसुख याची तबियत बरी नव्हती म्हणून मारुती हे उपचारासाठी त्याला घेऊन ते मोटारसायकलवर चालले होते.
जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथील पुलावर आल्यानंतर मनसुख याचा अचानक तोल जाऊन तो कुकडी नदीवरील पुलावरून नदीमध्ये पडला.
मोठा भाऊ पोपट मोरे याने त्याला वाचाविण्यासाठी उडी घेतली मात्र मनसुख तोपर्यंत खोल पाण्यात बुडाला होता. या घटनेची माहिती समजताच आळे फाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.