अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस आले आहेत.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची परिस्थिती सर्वत्र दिसत आहेत.
मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगरसह अनेक भागांत याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केलीय रईस अफजल शेख (रा. मातापूर), असे आरोपीचे नाव आहे.