अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- WWE च्या रिंगमध्ये नेहमीच प्रतिस्पर्ध्यांना मात देणाऱ्या ल्यूक हार्पर आयुष्याची लढाई हरला आहे.
डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) सुपरस्टार आणि माजी आयसी चॅम्पियन ल्यूक हार्पर (Luke Harper) यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झालं आहे. ल्यूक हार्पर फुफ्फुसाच्या आजाराने बऱ्याच दिवसांपासून आजारी होता.त्यावरून त्याचे हॉस्पिटलमध्ये उपचार पन घेत होता.
पत्नीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती :- ल्यूक हार्परच्या निधनाची बातमी त्याची पत्नी अमांडा (Amanda) हिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. लूकचे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे.त्याला बऱ्याच दिवसांपासून फुफ्फुसाचा आजार जडला होता.
डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी कुस्तीपटू जोनाथन ह्यूबरला (Jonathan Huber) ब्रॉडी ली (Brodie Lee) म्हणूनही ओळखले जात होते. ल्यूक हार्परची पत्नी अमांडा (amanda) हिने पोस्टमध्ये लिहिले, “माझा जिवलग मित्र आज गेला. मला हे शब्द कधीच लिहायचे नव्हते.मला हे लिहिताना खूप वेदना होतं आहेत.
माझ हृदय तुटल आहे. त्याने जगाकडे आश्चर्यकारक नजरेने पाहिल,आणि गतप्राण झाला. पण तो माझा जिवलग मित्र, माझा नवरा आणि खूप चांगला पिताही होता” ल्यूक हार्परच्या मृत्यूने चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.
ल्यूकचे रिंगच्या बाहेर सगळ्या प्रतिस्पर्ध्यांसोबत चांगले मैत्रीचे संबंध होते. भारतातही ल्यूकचे मोठे चाहते आहेत. जगभरातील त्याचे चाहते मृत्युमुळे हळहळ व्यक्त करत आहेत