शिर्डीमधील दुकाने ‘या’ वेळेत खुली राहणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहे. यातच जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर घट स्थापनेपासून खुले होणार आहे.

मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने याठिकाणी दुकानासाठी वेळेचे बंधन लागू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील दुकाने रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मंदिरे खुले करण्यापूर्वी शिर्डीत जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की, जिल्हातील मंदिराच्या संस्थांनी हमीपत्र देणे गरजेचे आहे.

शिर्डीतील व्यावसायिकांसाठी मुख्याधिकारी नरपरिषद नगर पंचायत यांना देखील सूचना दिल्या आहे. भाविकांना पूजेचं साहित्यही आणता येणार नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळूनच भाविकांना दर्शन दिले जाईल, दरम्यान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून शासन – प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

Ahmednagarlive24 Office