अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- शॉर्टसर्कीट होऊन 45 एकर ऊस जळाल्याने 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावातील वाणी मळ्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील वाणीमळ्यातील दिनकर काळे, सुभाष काळे, निवृत्ती काळे, शिवाजी काळे, शिवाजी बेल्हेकर, ज्ञानेश्वर चिंचवडे,
रोहन बेल्हेकर, अशोक काळे, सुदाम काळे, इंदुबाई जाधव, जयराम काळे, दत्तात्रय काळे, विठ्ठल काळे, अभय चोरडिया, राजेंद्र चोरडिया, वसंत काळे,
रमेश काळे, या 18 शेतकर्यांचे एकूण 45 एकर क्षेत्र आहे. दरम्यान त्यांच्या या क्षेत्रातून महावितरणची विद्युत वाहिनी गेलेली आहे.
दरम्यान याच विद्युत तारेचा शॉर्टसर्किट होऊन निघालेल्या आगीच्या ठिणग्याने संबंधित शेतकऱ्यांचा उसाने पेट घेतला. यातील काही उसाची तोड चालू होती तर काही ऊस थोड्याच दिवसांत कारखान्याला गाळपासाठी जाणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
या उसाचे पंचनामे करण्यात आले असून महावितरणाच्या गलथान कारभारामुळे हे नुकसान झाल्याचे शेतकर्यांच्या म्हणणे आहे. विजेच्या शॉर्टसर्कीटने ऊस जळाला असून या शेतकर्यांना त्यांची भरपाई मिळालेली नसून महावितरण कंपनीकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.