‘त्यांनी’ यात्रेत फिरून वेळ घालविण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात वेळ घालावा….!

Maharashtra News:इतिहास माहित नसताना कॉँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वक्तव्ये ही केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंट असून, यात्रेत फिरून वेळ घालविण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात त्यांनी वेळ घालावा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.

त्यांनी म्हटले आहे की, सावरकरांच्या विरोधात आपण बोललो, म्हणजे खूप मोठे होऊ, असे कोणाला वाटत असेल तर, तो त्यांचा भ्रम आहे. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग खूप मोठा असून याची माहिती त्यांनी घ्यावी.

Advertisement

कोणताही इतिहास माहिती नसताना त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणं म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असून भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत नसल्यानेच महाराष्ट्रात सावरकरांविरेाधात बोलून लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे.

शिवसेनेने सत्तेपोटी मागील अडीच वर्षांपूर्वीच सर्व तत्व आणि विचार सोडून दिले आहेत. ज्यावेळी मणीशंकर अय्यरांनी सावरकारांच्या विरोधात कृती केली,

तेव्हा वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभागी झाले होते. आज मात्र त्यांचे पुत्र आणि नातू सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत.असा टोला देखिल त्यांनी लगावला.

Advertisement