अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘बेरोजगार दिन’ साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेसकडून करण्यात आला. मग महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोहत्या होती तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोहत्या दिन’ साजरा करायचा का ?

असा तिखट सवाल कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विचारला आहे वहाडणे म्हणाले,संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे रात्रंदिवस हजारो गायींची हत्या होत आहे. गोहत्येला कायद्याने बंदी असतांना कॅबिनेट मंत्र्यांच्या गावात सर्रासपणे गायींची कत्तल होत आहे.

म्हणून तुमच्या नेत्यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. माझे म्हणणे चुकीचे आहे, असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तसे जाहीर करा, असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.

मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘बेरोजगार दिन’ साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेस करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहिर करून आपल्या पोरकटपणाचे जाहीर प्रदर्शन केले आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी त्या आवाहनाला उत्तर देताना एका प्रसिद्धी पत्रकान्वये हा समाचार घेतला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे पंतप्रधान मोदीं विरुद्ध असे काही केल्याने तुम्हाला बढती मिळणार असेल तर आपला काही आक्षेप नाही असा शालजोडाही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी लगावला आहे.