आता आम्हीच हातात झाडू घ्यावा का…? साफसफाईवरून मनपाच्या सभेत सदस्य आक्रमक!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साफसफाई अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र असे असताना देखील शहरात साफसफाई वेळेवर केली जात नाही. या मुद्यावरून पालिकेच्या स्थायी सभेत सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत हा प्रश्न ऐरणीवर आला असून सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने साफसफाई होत नाही.

सध्या कोरोनाची काळात साफसफाई होणे गरजेचे असताना मनपा प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने सदस्यांनी मनपा प्रशासनाला आता आम्हीच हातात झाडू घ्यावा का? असे बोल सुनावले.

यावेळी सफाई कामगारांना अधिकारी वैयक्तिक तसेच कार्यालयीन कामांसाठी वापरतात.  प्रभाग एकमध्ये साफसफाई होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला.

नंतर प्रभागात साफसफाई होत नसेल तर नगरसेवकांनी हातात झाडू घ्यायचा का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. शाम नळकांडे यांनी त्यांच्या प्रभागातील साफसफाईचा विषय उपस्थित करत सफाई कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून वैयक्तीक कामांसाठी वापरत असल्याचा आरोप  केला.

यावेळी शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सर्वांनीच ठेकेदारावर राग व्यक्त करत ठेकेदाराकडून डांबरीकरणाचा व काँक्रिटीकरणाचे पॅचिंग केले जात नसल्याचे सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24