अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना आजाराची भयानक परिस्थिति आहे.
मात्र जिल्यातील तीन मंत्र्यांसह पालकमंत्र्यानी आढावा बैठक घेतली नाही त्यामुळे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका असा फंडा माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांनी राबविला आहे
राहुरी तालुक्यातील पत्रकार दातीर यांच्या हत्येप्रकरणी कर्डीले एसपी पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते त्याप्रसंगी बोलत होते
नगरमध्ये कोरोनाचे रुग्न दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्हयातील मंत्र्यांना गांभीर्य नाही कालच एकाच दिवशी 42 रुग्नांवर अंत्यसंस्कार करण्यात आले
ही परिस्थिति आटोक्यात आनण्यासाठी कोणत्याही मंत्रयाने जिल्यासह तालुक्यात बैठका घेतल्या नाही त्यामुळे हे मंत्री हरवले की काय अशी शंका निर्माण झाली आहे
त्यामुळे मंत्री दाखवा आणि 1 लाख रुपये जिंका हे लाख रुपये आपल्या खिशातुन देण्यात येईल असेही कर्डीले यांनी स्पष्ट केले आहे.