अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- लग्न म्हणजे दोन जीवांचे त्याच सोबत दोन कुटुंबाचे मिलन. असे म्हणतात की लग्नानंतर एक नवीन आयुष्याची सुरुवात होते.
त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाला खूप महत्व आहे परंतु अलीकडे पाशच्त्य संस्कृतीचे अनुकरण केल्याने लग्नाचे स्वरूप बदलले आहे.
त्यामुळे अनेकदा गैरप्रकार घडतात. असाच प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे. यात एक महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील एक महिला व खेड तालुक्यातील नागेश गुलाब कराळे यांची ओळख झाली.
नंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे कराळे याने लग्नाचे आमिष दाखवून या महिलेवर बावधन, पुणे व संगमनेर तालुक्यात तब्बल २०१६ पासून संबंध ठेवले.
दरम्यानच्या काळात ही महिला गरोदर राहिली. ही बाब कराळे याला समजल्यानंतर कराळे याने खरेदी केलेल्या मालमत्तेचे खरेदीखत व आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन पलायन केले.
याबाबत संबंधित महिलेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नागेश गुलाब कराळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.