अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- गुन्हेगार वस्त्यांवर कोम्बिंग ऑपरेशन राबवून श्रीगोंदा पोलिसांनी रेकॉर्डवरील १९ आरोपींना अटक केली. यात मोक्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करून
पुढील कारवाईसाठी पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे, शिरूर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
तालुक्यात दरोडा, चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गुन्हे, तसेच खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र वापरून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसावा, या उद्देशाने वेळोवेळी पोलिसांनी विशेष मोहिमेंतर्गत कारवाया करून वरील १९ आरोपींना अटक केली आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी दरोडा, घरफोडी व चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघड करीत आरोपींकडून २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी नुकतीच गावठी हातभट्टीची दारू तयार करणारे व अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून २२ आरोपींविरुद्ध कारवाई करून ४६ हजार ४९ रुपये किमतीचा माल जप्त केला आहे, अशी माहिती ढिकले यांनी दिली.