अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसेच कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले होते.
मात्र तरीही बेफिकीर होऊन फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. व त्यांच्याकडून दंड देखील वसूल करण्यात आला होता.
यातच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी दोन महिन्यांच्या कोरोना लाॅकडाऊन काळात ४ हजार ७३९ गुन्हे दाखल करून तब्बल ३४ लाख ८१ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे,
अशी माहिती पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन जाहीर करत
विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून प्रत्येकी ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिसांनी ही दंडात्मक कारवाई केली. यामध्ये बेलवंडी पोलिसांनी नगर-पुणे रस्त्यावर गव्हाणेवाडी शिवारात नाकेबंदी केली होती. तेथून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला.