शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर यात्रा यंदाच्या वर्षीही रद्द

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील ग्रामदैवत तसेच परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान यात्रा उत्सव यंदाच्या वर्षी देखील रद्द करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती देवस्थानचे मठाधिपती बाबागिरी महाराज यांनी दिली आहे. श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान या ठिकाणी महादेवाची स्वयंभू पिंड आहे.

शेवगाव तालुक्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान म्हणून हे देवस्थान ओळखले जाते. प्रत्येक सोमवारी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येथे येत असतात, तर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते.

परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने याही वर्षी ही यात्रा रद्द केली जात आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे देवस्थान कमिटीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून आलेल्या कोरोना संकटामुळे अनेक सण उत्सवाववर पाणी फेरले असून सर्व साध्या पद्धतीने करावे लागत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24