अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.84 रुपये प्रतिलिटर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 89.87 रुपयांवर स्थिर राहिला.
सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. मागील काही दिवसांपासून हे दर स्थिर आहेत.
अनेक तज्ज्ञांचे असे मत आहे की हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत आहेत. प.बंगालच्या विधानसभा निकालानंतर तब्बल 11 रुपयांनी हे दर वाढले आहेत. काही तज्ज्ञांचे मत आहे की हे दर 150 रुपयांपर्यंत देखील जाऊ शकतात. परंतु असे असले तरी मागील काही दिवसांत मात्र हे दर स्थिर आहेत.
जाणून घ्या महानगरांतील आजचे लेटेस्ट रेट
– आता दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.84 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 89.87 रुपये आहे.
– कोलकातामध्ये आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 102.08 रुपये आहे. तर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 93.02 रुपये आहे.
– आता मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 97.45 रुपये आहे.
असे ठरवतात किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.
पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ?:- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.
पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.