रूग्णसंख्या न घटल्यास जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचे संकेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- नगर जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असून आगामी काही दिवसात रूग्णांची संख्या न घटल्यास आणखी कडक लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळत आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात 1 मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन 15 दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते.

मात्र, आता हा लॉकडाऊन 31 मेपर्यंत असून आता पुढील नियमावली काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार दिवसात लॉकडाऊनच्या शिथिलतेवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.

हे 14 जिल्हे रेड झोनमध्ये :- अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24