सोन्यासह चांदीही महागली; जाणून घ्या आजचे दर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- आज पुन्हा एकदा सोन्याची झळाळी वाढली असल्याचे चित्र दिसून आले आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 116 रुपयांनी वाढून 46,337 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.

तर तयार चांदीचा दर 161 रुपयांनी वाढून 67,015 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.

कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव 6.10 डॉलर वाढीसह 1,783.90 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या भावाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी वैश्विक वायदा भावात तेजी पाहायला मिळाली.

चांदीची किंमत 0.18 डॉलर तेजीसह 26.31 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली. चांदीचा हाजीर भाव 0.08 डॉलर म्हणजे 0.31 टक्के तेजीसह 26.18 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. जागतिक बाजारातील दराप्रमाणे भारतातील वायदे बाजारात सोन्याचे दर वाढले.

त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य सहा पैशांनी घसरले होते. रुपयाचे मूल्य सध्या एकूणच कमी पातळीवर असल्यामुळे आयातदारांना सोने महाग पडते.

अहमदनगर लाईव्ह 24