Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Sim Card Registration Fraud : सावधान! तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना? असं करा चेक

तुमच्या नावाने कितीजण सिम कार्ड वापरत आहेत हे तुम्ही आता सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

Sim Card Registration Fraud : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. परंतु सिम कार्डशिवाय स्मार्टफोन अपूर्ण असतो. प्रत्येक स्मार्टफोनला सिमकार्ड असतेच. सध्या सिम कार्ड सहज मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

काहीजण एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरतात. एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड घेता येतात. मात्र सध्या बनावट सिमकार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम घेतले आहे का ते सहज तुम्ही पाहू शकता.

खरं तर ही एक वेबसाइट असून जी तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत हे एका मिनिटात सांगू शकते. त्यानंतर तुम्ही हे बनावट सिम कार्ड याच वेबसाइटवरून सहज ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या नावावर सुरू असणाऱ्या नंबरचा गैरवापर टाळता येतो.

वेबसाइटची होईल मदत

भारतीय दूरसंचार विभागाकडून सिम कार्ड घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याद्वारे तुमच्या आयडीवर किती सिम चालू आहेत हे तुम्हाला सहज समजू शकते. जर कोणी तुमच्या माहितीशिवाय सिम कार्ड सक्रिय केले असेल, तर ते आता तुम्ही सहज ब्लॉक करू शकता.

फॉलो करा या स्टेप्स

  • तुम्हाला सर्वात अगोदर सिम नोंदणी तपासण्यासाठी, भारतीय दूरसंचार विभागाच्या साइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर या पोर्टलवर ( https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php ) भेट देऊन लॉग इन करावे लागणार आहे.
  • या ठिकाणी तुमचा नंबर टाका, त्यानंतर तुम्हाला OTP मिळेल तो पोर्टलवर टाकावा लागणार आहे.
  • यानंतर आता तुम्ही क्रमांकावर नोंदणीकृत सक्रिय कनेक्शन दाखवण्यास सुरुवात होईल.
  • या ठिकाणी तुम्हाला नंबर ब्लॉक करण्याची विनंती करता येईल.
  • आता तुम्हाला एक तिकीट आयडी पाठवण्यात येईल जेणेकरून तुम्ही त्याचा सहज मागोवा घेऊ शकता.
  • अशाप्रकारे हा नंबर काही आठवड्यात बंद केला जाईल.