अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी नुकताच आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यामवेत अगस्ति कारखाना, अमृतसागर दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी प्रवेश केला आहे.
त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडिया मध्ये माजी आमदार वैभवराव पिचड यांचे समर्थक असणार्या काही कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे.बर्याच वेळेला व्यक्तिगत टीका करताना टीकेची पातळी घसरल्याचे दिसून येत आहे.
म्हणून गायकर यांनी यावर भाष्य करताना म्हणाले कि, गेली माझ्या कामाचे मूल्यमापन करेल असा विश्वास व्यक्त करतानाच सोशल मीडियातून आपल्यावर होत असणार्या टीका टिप्पणीकडे कार्यकर्त्यानी दुर्लक्ष करावे असे आवाहन त्यांनी आपल्या समर्थक व अनुयायांना केले आहे.
या टीकेला कार्यकर्त्यांनी उत्तर देण्याच्या फंदात पडू नये,जेंव्हा वेळ येईल तेंव्हा जनताच याला चोख उत्तर देईल व माझ्या कामाचे योग्य मूल्यमापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गायकर यांच्या राष्ट्रवादी मधील प्रवेशाचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.शहरात तसेच तालुक्यात ठीकठिकाणी त्यांच्या स्वागतकाचे 5 फ्लेक्स लागले आहेत.