बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार ..!

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील चांदा परिसरात कालच बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक शेळी फस्त केली होती.

त्यानंतर खरवंडी- सोनई रस्त्यावरील बापूसाहेब पंढरीनाथ फाटके या शेतकऱ्याच्या घरी बिबट्याने सहा शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या हल्ल्यात एक शेळी जबर जखमी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, खरवंडी चारी नं. ४ जवळ खरवंडी- सोनई रोडजवळ फाटके यांची वस्ती आहे.

जवळच मनोज चोरडिया यांची खत कंपनी आहे.बिबट्याने थेट हल्ला करून सहा शेळ्या ठार मारण्याच्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकरी रात्री शेतीस पाणी देण्यास जात नाहीत, तर बिबट्याच्या भीतीने शेतमजूर काम करण्यास येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.