अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अकोले तालुक्यात धान्याचा काळाबाजार करणाऱ्या चार ट्रक राजुर पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. यातील आरोपीनवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती.
याच सहा आरोपींची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागील आठवड्यात राजूर पोलिसांनी एकामागे एक येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांचा माल वाहतूक करणाऱ्रे चार संशयास्पद ट्रक पकडले होते.
याप्रकरणी राजूर पोलिसांनी चार वाहन चालकांना गुरुवारी अटक केली होती. या चार जणांना न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
यानंतर शनिवारी रात्री गोदामपाल यास पोलिसांनी अटक केली. चालक आणि गोदामपाल यांच्या चौकशीतून सबडीलर यास शनिवारी रात्रीच पोलिसांनी अटक केली होती.
यात चालकांना न्यायालयाने तीन दिवसांची, तर गोदामपाल आणि सबडीलरला प्रत्येकी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने या सहा जणांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या सहा जणांची जामिनावर मुक्तता केली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक खैरनार यांनी सांगितले.