Skin Care Tips : त्वचेचा रंग उजळवण्यासाठी आणि निरोगी त्वचेसाठी (Healthy skin) अनेकदा वेगवेगळ्या गोष्टी वापरल्या जातात. त्यासाठी अनेकजण कधी कॉस्मेटिक (Cosmetic) तर कधी घरच्या घरी उपायही करून पाहतात.
दररोज केळी खाल्ल्याने शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहितच आहेत. परंतु हीच केळी त्वचेला लावली तर त्यामुळे त्वचेचा रंग गोरा होण्यास मदत होते.
त्वचेसाठी केळीचे फायदे
केळी त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. चेहऱ्यावर इतर अनेक गोष्टींसोबत मिसळल्याने एक अद्भुत चमक येते. केळीपासून तयार केलेले असे 3 फेस पॅक (Banana Face Pack) आहेत,ज्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घेऊया केळीपासून फेस पॅक बनवण्याची सोपी पद्धत आणि फायदे…
1. हळद, कडुलिंब आणि केळीचा फेस पॅक
फायदे-
कडुलिंब आणि हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यांच्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म (Anti-bacterial properties) असतात, जे चेहऱ्याला नुकसान करणारे बॅक्टेरिया नष्ट करतात.
2. दही आणि केळीचा फेस पॅक
फायदे-
दही त्वचेसाठीही फायदेशीर आहे. या पॅकमुळे त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. त्वचा मऊ होऊन चमकू लागते.
3. पपई, काकडी आणि दही फेस पॅक
फायदा-
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर केळीसोबत काकडी आणि पपई मिसळून बनवलेला फेस पॅक लावावा. यामुळे त्वचा तेलमुक्त होते. विशेष म्हणजे यामुळे चेहरा स्वच्छ आणि चमकदार होतो.