Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Skoda SUV : स्कोडाची शानदार कार लाँच! शक्तीशाली इंजिनसह मिळणार ‘हे’ फीचर्स

Skoda SUV : स्कोडाची आणखी एक कार मार्केट गाजवण्यास सज्ज झाली आहे. भारतीय बाजारात Skoda ची SUV लाँच झाली आहे. कंपनी आपल्या आगामी कारमध्ये उत्कृष्ट इंजिन देत आहे. कंपनीकडून Skoda Kodiaq लाँच करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

इतकेच नाही तर कंपनीच्या आगामी कारमध्ये तुम्हाला जबरदस्त वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसेच यात उत्तम सेफ्टी फीचर्स कंपनीकडून देण्यात येणार आहे. कंपनीची ही कार मार्केटमधील इतर कारना कडवी टक्कर देईल. कसे ते पहा.

जाणून घ्या पॉवरट्रेन

नवीन Skoda SUV मध्ये 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड TSI पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन पूर्वीपेक्षा 4.2% जास्त कार्यक्षम असून हे जास्तीत जास्त 190 PS पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे 4×4 कॉन्फिगरेशनसह 7-स्पीड DSG ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. अवघ्या 1.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग ही कार घेईल असा दावा कंपनीने केला आहे.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीने या कारमध्ये अनेक शानदार फीचर्सही दिली आहेत. कंपनीने यात डायनॅमिक टर्न इंडिकेटर, पॅनोरामिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, तीन-झोन क्लायमेट कंट्रोल, नऊ एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ESC, वायरलेस स्मार्टलिंक कनेक्टिव्हिटीसह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 12-स्पीकर कॅंटन साउंड सिस्टमसह संपूर्ण एलईडी हेडलाइट्स यांसारखी फीचर्स दिली आहे.

पहा किंमत

किमतीबाबत बोलायचे झाले तर कंपनीकडून या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 37.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी, तुम्हाला 41.39 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.