अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- सध्या अनेकांना आपल्या कुटूंबाकरीता चांगली व प्रशस्त अशी कार घेण्याचे स्वप्न असते. आणि त्यादृष्टीने तो प्रयत्नही करतो. परंतु बाजारात अनेक कंपन्यांच्या विविध प्रकारच्या कार उपलब्ध असल्याने कोणती कार घ्यावी, याबाबत संभ्रम असतो.
परंतु स्कोडा कंपनीने सर्वसामान्यांचा विचार करुन विविध फिचर्स असलेली सर्व सोयींयुक्त अशी एसयुव्ही प्रकारात ‘कुशक’ ही कार उपलब्ध करुन दिली आहे. माफक किंमत आणि अनेक सुविधांमुळे या कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.
नगरमध्येही या कारचे वितरण सुरु झाले असून, त्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्तम व तत्पर सेवे साठी सज्ज असलेल्या सारा मोटर्स येथे स्कोडा कंपनीच्या कार्स पाहण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलबद्ध आहेत.
नगरकरांनी नवीन कार खरेदी करण्या अगोदर एक वेळ स्कोडा कारच्या शोरूमला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन सारा मोटर्सचे व्यवस्थापक शशिकांत मोहिते यांनी केले. स्कोडा कंपनीने नुकतीच नवीन एस. यू. व्ही. प्रकारात ‘कुशक’ ही कार अनेक सिम्पली क्लेव्हर फीचर्स व सुविधांसहित विक्री करिता बाजारात उपलब्ध करुन दिली आहे.
स्कोडा कार्सचे अधिकृत विक्रेते सारा मोटर्स प्रा. लि. औरंगाबाद यांची अहमदनगर मध्ये कायनेटिक चौक, परफेक्ट टायर कंपाऊंड येथे नवीन ब्रँच सुरु झाली आहे.
सारा मोटर्सतर्फे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिली कुशक कार श्री.जनार्धन पटारे रा.नेवासा. यांना परफेक्ट टायर कंपनीचे उद्योजक उदय खिलारी व सारा मोटर्सचे व्यवस्थापक शशिकांत मोहिते यांच्या उपस्थितीत हस्तांतरित करण्यात आली.
यावेळी अभिषेक पटारे, बाबा पटारे, प्रसाद पटारे, अभिलाष सोनावणे, विशाल कुर्हे, संतोष पटारे व मित्र परिवार उपस्थित होते. सारा मोटर्सचे श्री. आशिष बोरुडे यांनी कारची सर्वांना उत्तम माहिती दिली.
आफरीन खान यांनी सर्वांचे आभार मानले. या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या बेस व्हेरिएन्टची एक्सशोरूम किमंत 10,49,999/- रुपये आहे. या नवीन कुशक कारला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.