ताज्या बातम्या

जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आतापर्यंत ऊस, कांदा यांच्यासह 5 लाख 2 हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यात कांदा पिकाची लागवड ही विक्रमी 1 लाख 4 हजार 748 हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.(Rabbi crops)

जिल्ह्यात ऊस आणि कांदा पिकाशिवाय 2 लाख 85 हजार 121 हेक्टरवर (39 टक्के) पेरण्या झालेल्या आहेत. अवकाळी पावसावर मात करत जिल्ह्यात धिम्या गतीने रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू आहेत.

दरम्यान परतीच्या पावसाच्या दणक्यामुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. मात्र, ज्वारी पेरणीचा 15 ऑक्टोबरचा कालावधी संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी झालेली आहे.

ज्वारीचे क्षेत्र 1 लाख 75 हजार हेक्टरवर पोहचले आहे. जिल्ह्यात अनेक भागात उशीर पेरणी झालेल्या ज्वारी पिकावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिकटा या रोगाचा प्रार्दभाव झालेला दिसत आहे.

यंदा अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकचे क्षेत्र कमी होवू शेतकरी कांदा पिकाकडे वळाले आहे. यामुळे कांदा पिकाची लागवड विक्रमी होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 1 हजार 4 हजार 748 हेक्टरवर लागवड झालेली आहे. दुसरीकडे गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र वाढत असून आतापर्यंत सरासरीच्या 40 हजार 801 हेक्टरवर गव्हाची पेरणी झालेली आहे.

पेरणीची टक्केवारी 72 टक्के आहे. यासह हरभरा पिकाची पेरणी 53 हजार 772 हेक्टरपर्यंत पोहचली असून पेरणी टक्केवारी ही 35 टक्के झाली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office