file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका स्थानिक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर लाईट बील ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीज बिल न भरल्यामुळे

साकुर उपकेंद्र महावितरणने वीज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला मोठा धक्का दिला आहे परिणामी ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठा व त्याचे परिणाम झाल्यामुळे स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे मांडवा बुद्रुक ग्रामपंचायत ,

जांबुत ग्रामपंचायत ,ग्रामपंचायत कवठेमलकापूर ग्रामपंचायत अशा प्रतिष्ठित ग्रामपंचायतीने वेळी पाणीपुरवठा करणाऱ्या मोटार लाईट बील नभरल्यामुळे महावितरण लाईट कट करत ग्रामपंचायतीला फार मोठा शॉक दिला आहे

साकुर उपकेंद्राचे महावितरण उपअभियंता घुगे साहेब यांनी सांगितले की वेळोवेळी नोटिसा पाठवून देखील ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे

शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा करणाऱ्या वीज कनेक्शन तोडून महावितरणने ग्रामपंचायतीला मोठा शॉक दिला आहे अशी चर्चा परिसरात चालू आहे