Small Business Idea : अनेकांना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे असतील तर बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही आता एका व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसे कमवू शकता.
इतकेच नाही तर तुम्ही या व्यवसाय कमीत कमी पैशात सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर केंद्र सरकार तुम्हाला कोणत्याही हमीशिवाय सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज देत आहे.
बिंदी हे 16 अलंकारांपैकी एक असून काही दिवसापूर्वी फक्त गोल आकाराच्या बिंदीला मोठ्या प्रमाणात मागणी होती. परंतु आता बिंदी अनेक आकारात आणि डिझाइन्समध्ये उपलब्ध आहेत.
कमी गुंतवणुकीत जास्त फायदा
सध्या बिंदीचा बाजार खूप मोठा झाला असून आकडेवारीनुसार, एक महिला एका वर्षात 12 ते 14 पॅकेट बिंदी वापरत असते. तुम्ही आता फक्त 10,000 रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला कच्चा मालाची गरज आहे. यात मखमली कापड, चिकट गोंद, क्रिस्टल्स, मोती इत्यादी गरजेचे असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी बाजारात सहज मिळतात.
अशी बनवा बिंदी
सुरुवातीला फक्त तुम्हाला बिंदी प्रिंटिंग मशीन, बिंदी कटर मशीन आणि गमिंग मशीनची गरज असणार आहे. याशिवाय तुम्हाला इलेक्ट्रिक मोटार आणि हाताचे साधनाची गरज असेल. इतकेच नाही तर तुम्ही मॅन्युअल मशिन्सच्या मदतीने सुरुवात करू शकता, त्यानंतर तुमचा व्यवसाय वाढल्यावर तुम्ही ऑटोमॅटन मशिन्स घेऊ शकता.
किती होऊ शकते कमाई
कमाईचा विचार केला तर या व्यवसायात 50% पेक्षा जास्त बचत होते. जर तुम्ही तुमच्या उत्पादनाची योग्य प्रकारे विक्री केली तर तुम्ही महिन्याला कमीत कमी 50 हजार रुपयांची बचत होईल. या व्यवसायातील जाहिरात भाग हा सर्वात महत्त्वाचा भाग असून तुम्ही ते शहरातील कॉस्मेटिक दुकानांमध्ये पुरवू शकता.