Small Business Idea : सुरु करा किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या ‘या’ वस्तूचा व्यवसाय, महिन्यातच व्हाल लाखो रुपयांचे मालक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea 2023 : फेसबुक, Amazon सारख्या मोठ्या कंपन्यांमधून कामगारांची हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे. अनेकजण व्यवसायाकडे वळू लागले आहेत. परंतु सध्या अनेकजण व्यवसाय करत असल्याने तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोणता व्यवसाय सुरु करावा?

जेणेकरून नफा जास्त होईल. तुम्ही आता स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या एका वस्तूचा व्यवसाय सुरु करू शकता. यातून तुम्ही केवळ महिन्याभरातच लाखो रुपयांची कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला ट्रेनिंगची गरज पडणार नाही. कसे ते जाणून घ्या.

खादी ग्रामोद्योग आयोगाकडून अहवालात असे सांगण्यात आले आहे की, तुम्हाला आता 4.19 लाख रुपयांमध्ये कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.जर तुम्हाला हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर यासाठी तुमच्याकडे किमान 300 ते 500 चौरस यार्ड जागा असणे गरजेचे आहे. तुम्हाला कारखाना उभा करण्यासाठी तसेच टिन शेड बसवण्यासाठी एक लाख रुपये खर्चावे लागणार आहेत.

इतका होऊ शकेल खर्च

तुम्हाला पेस्ट तयार करण्यासाठी तळण्याचे पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, छोटी भांडी, मग,डिझेल भट्टी, निर्जंतुकीकरण टाकी, कप यांसारख्या वस्तूंवर सुमारे 1.75 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. हा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्हाला 2.75 लाख रुपये लागणार आहेत, कारण यासाठी तुम्हाला कच्चा माल खरेदी, पॅकिंग, वाहतूक आणि कारागिरांची मजुरी यांवर खर्च करावा लागू शकतो.

वाचतील लाखो रुपये

अहवालानुसार, समजा तुम्ही एका वर्षात 7.50 लाख रुपयांची विक्री करत असाल, तर त्यातून सर्व खर्च वजा करूनही तुमच्याकडे 1.75 लाख रुपये वाचतील. तसेच या व्यवसायातील नफा आपल्या विपणनावर अवलंबून आहे. समजा तुम्ही तुमचे बहुतांश उत्पादन मोठ्या प्रमाणात विकले नाही तर तुम्ही थेट ग्राहकांना किरकोळ विक्री करू शकता, त्यानंतर तुम्ही जास्त पैसे कमावू शकता.