Smartphone Blast : सावधान! वापरकर्त्यांनो.. लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, नाहीतर तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट झालाच समजा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Blast : स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या दररोज नवनवीन आणि शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असतात. जर तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.

स्मार्टफोन वापरत असाल तर त्याची तशी निगा राखणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. इतकेच नाही तर तुमच्या स्मार्टफोनचा स्फोटही होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

फोनची बॅटरी जास्त चार्ज झाल्याने फोनचे स्फोट होत आहेत. कधी-कधी लोकल चार्जरवरून फोन चार्ज केला तर फोन पेटतो. अशावेळी चार्जिंग दरम्यान फोन वापरू नये.

करा हे उपाय

1. तुमचा फोन थेट सूर्यप्रकाश आणि उष्णता स्त्रोतांपासून लांब ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे खास करून उन्हाळ्यात तुमचा फोन तुमच्या कारमध्ये किंवा डॅशबोर्डवर ठेवू नका.

2. तुमचा फोन चार्ज होत असेल, खास करून थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम वातावरणात वापरू नका. हे लक्षात ठेवा की तुमचा फोन चार्ज करण्यापूर्वी तो थंड करा.

3. तसेच कंपनीचा केवळ मूळ चार्जर आणि केबल वापरा. स्वस्त किंवा बनावट चार्जर, जास्त चार्जिंग, जास्त गरम होणे तसेच इतर समस्यांना कारणीभूत ठरेल. ज्यामुळे तुमच्या फोनचा स्फोट होईल.

4. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा फोन जास्त चार्ज करणे टाळावे. फोन पूर्ण चार्ज झाला की, तो चार्जरमधून अनप्लग करावा.

5. समजा तुम्हाला फोन खूप गरम होत आहे असे दिसले तर तुमचा फोन बंद करा आणि थंड होऊ द्या.

6. इतकेच नाही तर सतत तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवावे. सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये अनेकदा बग फिक्स आणि सिक्युरिटी पॅच यांचा समावेश असेल तर जे जास्त गरम होण्यापासून रोखण्यात मदत करतात.

7. चार्जिंग करत असताना तुमचा फोन तुमच्या उशीखाली किंवा इतर मऊ पृष्ठभागाखाली ठेवणे टाळा. यामुळे तुमचा फोन जास्त गरम होऊन आग लागेल.