Smartphone Offer : सध्या अनेक स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या भारतीय बाजारात आपले वेगवेगळे स्मार्टफोन लाँच करत आहेत. यातील काही फोन बजेट बाहेर असतात तर काही फोन बजेटमध्ये येतात. आता तुमच्यकडे जास्त बजेट नसेल तर काळजी करू नका.
कारण तुम्ही आता निम्म्या किमतीत महागडे फोन खरेदी शकता. तुमचे बजेट कमी असल्यास तर तुम्ही 10,000 रुपयांपेक्षा कमी फोन शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. Amazon सेलमध्ये तुम्ही 50% पर्यंत सवलतीत खरेदी करू शकता.
हे फोन खरेदी करा निम्म्या किमतीत
Redmi a2 ऑफर
8MP ड्युअल कॅमेरा सेटअप पोर्ट्रेट मोड सपोर्टसह चांगले फोटो कॅप्चर करत असून सेल्फीसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनची मूळ किंमत 9,999 रुपये इतकी आहे परंतु, या सेलमध्ये फोन 47% च्या डिस्काउंटनंतर 5,299 रुपयांना विकला जातोय.
Redmi 12c ऑफर
Amazon Sale 2023 दरम्यान बजेट-फ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असणाऱ्यांसाठी Redmi 12C हा एक उत्तम पर्याय असून हा फोन MediaTek Helio G85 प्रोसेसर सह येईल. Amazon सेलमध्ये हा फोन 50% डिस्काउंटवर तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच या फोनची मूळ किंमत 13,999 रुपये इतकी आहे जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका तुम्ही हा फोन सेलमध्ये 6,999 रुपये किंमतीला खरेदी करू शकता.
Samsung Galaxy M04 ऑफर
Samsung चा हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 octa-core प्रोसेसरद्वारे समर्थित असून यात 4GB RAM देण्यात आली आहे, जी नंतर RAM Plus सह 8GB पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये 13MP 2MP ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ४४% सूट देऊन तुम्हाला हा स्मार्टफोन 7,499 रुपयांना खरेदी करता येईल.
Samsung Galaxy M13 ऑफर
हे स्टायलिश अॅक्वा ग्रीन कलरमध्ये येत असून या फोनमध्ये मोठी 6000mAh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर उत्तम फोटोग्राफीसाठी 50MP 5MP 2MP ट्रिपल कॅमेरा मागील बाजूस आणि 8MP फ्रंट कॅमेरासह या फोनचा कॅमेरा सेटअप प्रभावी आहे. कंपनीचा हा फोन Amazon सेलमध्ये 38% च्या सवलतीनंतर 9,199 रुपयांना खरेदी करता येईल.