ताज्या बातम्या

Smartphone Offer : अप्रतिम ऑफर! 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार सॅमसंग आणि iQOO 5G फोन, कुठे मिळत आहे संधी? पहा

Smartphone Offer : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता तुम्ही Amazon च्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेलमधून स्वस्तात स्मार्टफोन विकत घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे फोन 5G फोन आहेत.

या फोनवर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तुम्ही आता या सेलमध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंग आणि iQOO 5G फोन सहज खरेदी करू शकता. ही सेल फक्त काही दिवसांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे फोन खरेदी करा.

iQOO Z6 Lite 5G ऑफर

4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या iQOO Z6 Lite 5G या फोनची मूळ किंमत 15999 रुपये इतकी आहे. मात्र सेलमध्ये, डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन 13,999 रुपयांना सहज खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक ऑफर अंतर्गत, या फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात येत आहे.

या सेलमध्ये या फोनवर 13,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे. फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले तसेच Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर मिळत आहे. तर फोटोग्राफीसाठी कंपनीकडून या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात येत आहे.

लावा ब्लेझ 5G ऑफर

6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या लावा ब्लेझ 5G या फोनची सेलमध्ये 27% डिस्काउंटनंतर 11,999 रुपयांना विक्री केली जात आहे. तसेच बँक ऑफरमध्ये, या फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी केली जाईल. तसेच कंपनी या फोनवर 11,200 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे.

या बजेट स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला यात 3 जीबी व्हर्च्युअल रॅमची सुविधा मिळत आहे. तसेच, हा फोन एकूण 9 जीबी रॅम उपलब्ध होत आहे. तर कंपनी या फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देत असून जो 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M33 ऑफर

सॅमसंग गॅलेक्सी M33 हा सॅमसंगचा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असणार आहे. या ऑफरमध्ये, हे 16,999 रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध असून कूपन डिस्काउंटसह, त्याची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी करण्यात येत आहे.

तर बँक ऑफर अंतर्गत, कंपनी या फोनवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. इतकेच नाही तर यावर एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यामुळे हा फोन 16,100 रुपयांनी स्वस्त होऊ शकतो. हा फोन 6000mAh बॅटरी आणि 50-मेगापिक्सेल मुख्य कॅमेराने सुसज्ज आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts