Smartphone Tips : स्मार्टफोन तुम्ही आता प्रत्येकाच्या हातात बघत असाल. स्मार्टफोन आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. स्मार्टफोनशिवाय अनेकांची कामे रखडली जातात. सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे.
त्यामुळे अनेकजण स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. अनेकजण पॅटर्न, पिन किंवा पासवर्ड तसेच फिंगरप्रिंट सेन्सरचा वापर करतात. जर तुम्हीही फिंगरप्रिंट सेन्सरने तुमचा फोन लॉक करत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण तुमची हीच चूक आता तुम्हाला खूप महागात पडू शकते.
फिंगरप्रिंट स्कॅनरचा वापर करून फोन लॉक किंवा अनलॉक करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चांगले नाही तर स्मार्टफोन निर्माते हा पर्याय का देतात, असा सवाल तुम्हाला पडला असणार. खरं तर, फिंगरप्रिंट प्रमाणीकरणाद्वारे फोन अनलॉक करणे सोपे असून डिव्हाइस इतर पर्यायांपेक्षा जलद अनलॉक करता येते. फिंगरप्रिंटपेक्षा पासवर्ड किंवा पिन सारखे पर्याय वापरणे खूप चांगले आहे, असे स्वतः गुगलच म्हणत आहे, का ते पहा.
असा फोन उघडेल
स्मार्टफोन्समध्ये आढळणारा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर किंवा मागच्या बाजूस माउंट करण्यात आलेला सेन्सर मानक बायोमेट्रिक प्रणालींइतका प्रगत नसून हे उघड आहे की या फोनला मूलभूत प्रमाणीकरणासह काम करावे लागणार आहे आणि त्याच्याशी निगडित तंत्रज्ञानासाठी जास्त जागा नाही.
त्यामुळे फिंगरप्रिंटच्या कॉपीच्या मदतीने फोन अनलॉक करण्यात येतो. तसेच इतर गोष्टींबरोबरच, वापरकर्त्यांकडे त्यांच्या स्वतःच्या फोनवर त्यांचे फिंगरप्रिंट्स असून ज्याची थोडीशी टिंकरिंग करून कॉपी करण्यात येऊ शकते.
फिंगरप्रिंट बदलता येत नाही
तुम्हाला आता हे विचित्र वाटेल मात्र तुम्ही तुमच्या फोनचे फिंगरप्रिंट बदलू शकत नाही. म्हणजे , तुमचा पॅटर्न, पिन किंवा पासवर्ड कधी लीक झाला तर, तुम्ही नवीन पिन, पॅटर्न किंवा पासवर्ड सेट करू शकता. मात्र हे फिंगरप्रिंटवर लागू होत नसून एकदा फिंगरप्रिंट लीक झाल्यानंतर किंवा त्याचा गैरवापर झाल्यानंतर, तुम्हाला फिंगरप्रिंट बदलता येत नाही. इतकेच नाही तर एखाद्याला तुमचा फिंगरप्रिंट समजला तर तुमचा फोन अनलॉक होऊ शकतो.
… तरीही संरक्षण मिळत नाही
जर एखाद्याला फिंगरप्रिंटच्या मदतीने तुमचे लॉक केलेले डिव्हाइस अनलॉक करायचे असल्यास तुम्ही झोपेत असताना किंवा बेशुद्धावस्थेतही फोन अनलॉक होतो. फिंगरप्रिंटच्या मदतीने लॉक केलेला फोन जबरदस्तीने अनलॉक करण्यात येतो यासाठी तुम्हाला तोंड उघडण्याचीही गरज पडणार नाही. पिन, पॅटर्न किंवा पासवर्ड तुमच्या मनात सुरक्षित असून हे फिंगरप्रिंटला लागू होत नाही. कोणीतरी जबरदस्तीने किंवा गुप्तपणे तुमचा फोन अनलॉक करू शकत नाही.