स्मार्टफोन करू शकतो तुमच्या सेक्स लाइफवर घातक परिणाम !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- स्मार्टफोन सतत आपल्या शरीराच्या जवळ असत असला तरी तो आपण कुठे ठेवतो त्यानुसार आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. यातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनाचे घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

यात लैंगिक आरोग्याचाही समावेश आहे. चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या पद्धतीने स्मार्टफोन ठेवल्यास आपल्या लैंगिक आयुष्यावर, खासकरून पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता वाढते.

सामान्यतः आपण पँटच्या दोन्ही बाजूच्या खिशात स्मार्टफोन ठेवतो. मात्र यामुळे शुक्राणूंची संख्या आणि दर्जावर परिणाम होतो. तसेच पँटच्या मागच्या खिशात स्मार्टफोन ठेवल्यामुळे मज्जातंतूवर वाईट परिणाम होऊ शकतो.

कमरेच्या खालच्या भागाला आणि नितंबालाही त्रास होऊ शकतो ज्यामुळे उठताना आणि बसताना वेदना होऊ शकतात. आपल्यापैकी बरेच जण शर्टाच्या खिशात फोन ठेवतात.

मात्र मोबाईलच्या रेडिएशनचा थेट परिणाम यामुळे हृदयावर होऊन उच्च रक्तदाब, मधुमेह उद्भवू शकतात. रात्री झोपताना फोन पाहात झोपल्याने आपल्या झोपेवर परिणाम होशू शकतो.

अनेकदा आपण फोन चार्जिंगला लावून उशाशी ठेवून झोपतो. चार्ज होताना फोनमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा परिणाम मेंदू आणि त्वचेवर होऊ शकतो. त्यामुळे हे कटाक्षाने टाळा.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24