वियरेबल कंपनी BOULT ने आपली नवी स्मार्टवॉच Mirage भारतात लाँच केली आहे. ही अत्यंत परवडेबल स्मार्टवॉच आहे, ज्याची किंमत 2,199 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत हा हे स्मार्टवॉच 1,799 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
BOULT Mirage स्मार्टवॉचमध्ये 1.39 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तसेच ब्लूटूथ कॉलिंगसह 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचची डिझाईन अतिशय स्टायलिश आहे. हा फोन आयनॉक्स स्टील, अंबर ब्लू आणि कोल ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. BOULT Mirage स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट www.boultaudio.com आणि फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल.
Boult Mirage फीचर्स
BOULT Mirage स्मार्टवॉच आकर्षक आणि स्टायलिश डिझाइनसह येते. त्याची लाइटवेट मेटल फ्रेम स्मार्टवॉच एकदम आरामदायक बनवते. 1.39 इंचाचा एचडी डिस्प्ले शार्प आणि विविड व्हिज्युअल्स प्रदान करतो.
IP67 रेटिंगसह, हे वॉटर रेझिस्टंट देखील आहे. फिटनेस प्रेमींसाठी या स्मार्टवॉचमध्ये 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. धावणे, चालणे, सायकल चालविणे, योगा, पोहणे इत्यादी माध्यमांच्या मदतीने आपण आपले आरोग्य आणि तंदुरुस्ती ट्रॅक करू शकता.
Boult Mirage फिटनेस फीचर्स
BOULT Mirage स्मार्टवॉचमध्ये अनेक आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इन-बिल्ट हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकरचा समावेश आहे.
बोल्ट मिराज स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट देखील आहे. म्हणजेच या स्मार्टवॉचचा वापर करून तुम्ही तुमच्या फोनवरील कॉल रिसीव्ह आणि डिस्कनेक्ट करू शकता. यात बिल्ट-इन स्पीकर आणि मायक्रोफोन आहेत.
स्मार्टवॉच ची क्रेझ : सध्या तरुणांमध्ये स्मार्टवॉच ची चांगली क्रेझ आहे. आजकाल अनेक तरुण स्मार्टवॉच वापरतात. त्यात अनेक फिचर्स येतात. फिटनेस राखणाऱ्या तरुणांमध्ये याची जास्त क्रेझ दिसून येते. आपण किती पावले चाललो किंवा ऑक्सिजन लेव्हल आदी गोष्टी ते सातत्याने चेक करत असतात. अशा लोकांत स्मार्टवॉचची क्रेझ जास्त पाहायला मिळते.