ताज्या बातम्या

…म्हणून बँकांचे कामकाज चार दिवस ठप्प होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Maharashtra News :- बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा २८ व २९ मार्च रोजी संप पुकारला आहे. त्याला जोडूनच शनिवार व रविवार असल्याने चार दिवस बँकांचे काम ठप्प होणार आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. लोकसभेच्या या अधिवेशनात कुठल्याही क्षणी बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडण्यात येऊ शकते.

त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध करण्यासाठी हा संप पुकारला आहे. या संपात बहुसंख्य बँक कर्मचारी आणि बँक अधिकार्‍यांची दोन नंबरची मोठी संघटना एआयबीओए सहभागी होत असल्यामुळे स्टेट बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक सोडता इतर सर्व बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प होणार आहे.

या संपात जुन्या खाजगी बँका, काही विदेशी बँका, ग्रामीण बँक तसेच सहकारी बँकेतील कर्मचारीही संपात सहभागी होणार आहे. संप फक्त कर्मचाऱ्यांसाठी नाही.

देशातील सामान्य माणसाची शंभर लाख कोटी रुपयापेक्षा जास्तची बचत सुरक्षित राहावी, यासाठी बँकिंग सार्वजनिक क्षेत्रात राहावे म्हणून बँक कर्मचारीवर्ग हा संप करत आहे.

हे लक्षात घेऊन बँक ग्राहक तसेच जनतेने या संपाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जनरल सेक्रेटरी देवीदास तुळजापूरकर यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office