…त्यामुळे लोकशाही आणि संविधानही धोक्यात येईल – रामदास आठवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधानही धोक्यात येईल, अशी भीती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

तसेच राज्याचे मुख्यमंत्री सरकारसोबत गाडीही चालवितात. यामुळे मला वाटते, त्यांना कार चालविण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा, सरकार आम्ही चालवू असा टोला खा. आठवले यांनी त्यांना लगावला. मंत्री आठवले नगरला आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद केला.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंबंधी आठवले म्हणाले, उद्योजक अदानी आणि अंबानी यांचा कृषी कायद्यांशी संबंध जोडणे चुकीचे आहे. त्यांच्या फायद्यासाठी मोदी सरकारने हे कायदे केले, हा दावाच खोटा आहे. अदानी आणि अंबानी यांचे व्यवसाय वेगळे आहेत. ते कृषीमालावर अवलंबून नाहीत. शिवाय या कायद्यामुळे ते कृषी मालाच्या खरेदीला येतील, असेही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले.

त्यामुळे ते अशा कोणाच्या फायद्यासाठी कायदे करतील, अशी शक्यता आजिबातच नाही. कृषी कायद्यावरून बोलताना ते म्हणाले कि, कमीतकमी सर्वोच्च न्यायालाचा आदेश आल्यावर तरी ऐकायला हवे होते. मात्र, आंदोलन वाढवतच नेले जात आहे. आम्हीही आंदोलने केली.

मात्र, लोकांना वेदना होतील असे कधीही वागलो नाही. हे शेतकऱ्­यांचे आंदोलन मात्र चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. या आंदोलनासंबंधी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालाचा जो काही निकाल आहे, त्याचे पालन करण्यास सरकार तयार आहे. सर्वांनीच कायद्याचा सन्मान करायला हवा.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24