अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर प्रशासन कुठली ही ठोस उपाययोजना करत नाही.
दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ कधी तरी येतात आणि कडक लॉकडाऊन करा, जनता कर्फ्यु पाळा असे आदेश देतात अणि निघून जातात. आता ‘लॉकडाऊन’ या शब्द केवळ चेष्टेचा विषय झाला आहे.
इतर देशांत कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटा येत होत्या त्यावेळी ‘हे’ सरकार झोपले होते का? आज २००० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्र्यांना ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची उपरती झाली. आज जिह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
रुग्णांना ऑक्सीजन , बेड, टेस्टिंग किट, लसीकरण कसे ताबडतोप होइल मिळेल या वर पालकमंत्र्यांनी एक महिना अगोदर उपाययोजना करणे गरजेच असतांना पालकमंत्री तहान लागल्यावर विहीर खोदत आहेत.
राष्ट्रीय लसीकरण मोहीम ४५ वयांच्या पुढील लोकांची चालु आहे. त्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे, खरं तर ही राज्याची मोहीम आहे. ती दुसऱ्या ठिकाणी राबविणे गरजेच आहे.
आधीच ज्येष्ठ नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत लसीकरण केंद्रावर उभे राहतात. त्यात परत ही गर्दी म्हटल्यावर कोरोना वाढणारच ना, त्यात त्याच ठिकाणी कोणाच्या रुग्णांचे टेस्टिंग या सर्व गोष्टी वर उपाययोजना करायचे
सोडुन लॉकडाऊन पाळा एवढा बोलायचं आणि निघून जायचे. हेच सांगायचे असेल तर तुम्ही परत येऊच नका. असा खोचक सल्ला मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिला आहे. रेशन दुकानांवर नागरिकांना धान्य कमी देत आहेत.
हे पाहणे गरजेचे आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने तील खाजगी हॉस्पिटल गोरगरिब रुग्णांचे उपचार करतात का, रेमडीसिविर इंजेक्शन अजूनही कोरोना रूग्णांना मिळत नाही. या अडचणीतून लोकांना बाहेर काढणे गरजेच आहे.
लोकांचे पूर्वपदावर आणण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असताना अहमदनगर ला आल्यावर मुंबईच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलतात आणि कडक लॉकडाऊन, जनता कर्फ्यु नागरिकांनी पळाला पाहिजे असे आदेश प्रशासन व नागरिकांना देऊन जातात.
तुम्ही जर जिल्हयातील नागरिकांना लॉकडाऊन, जनता कर्फ्यु पाळा हेच सांगणार असतील तर पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात येऊ नका, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पालकमंत्र्यांना अहमदनगर जिल्ह्यात येऊ देणार नाही असा इशारा भुतारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.