अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी वर्षावरील १८ वर्षावरील ८ हजार ४४७ युवकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख ४५ हजार ३५८ जणांना दिली लस देण्यात आली आहे.
नगर जिल्ह्यात १३४ केंद्रावर सध्या लसीकरण सुरू आहे. यात जिल्हा शासकीय रुग्णालयासह २ उपजिल्हा रुग्णालये,७४ जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच जिल्हा परिषदेची उपकेंद्रे व महापालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रामध्ये ही लस दिली जाते.
नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठवड्यापासून अठरा वर्षा वरील युवकांना लस दिली जात आहे. पहिल्याच दिवशी विविध केंद्रावर १८ वर्षावरील ८ हजार ४४७ युवकांना पहिला डोस देण्यात आला.
सोमवारी दिवसभरात विविध वयोगटातील १५ हजार ४७९ जणांना लस देण्यात आली. दरम्यान एक मेपासून खाजगी रुग्णालयांना जस देणे बंद झाले आहे नगर शहरातील केवळ स्वास्थ्य या खाजगी हॉस्पिटलला ५ हजार डोस देण्यात आले होते.