अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- भारतासह सर्व देश अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. भारतानं देखील आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहिम राबवली आहे. रविवारी भारतानं एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या विमानातून चारशे भारतीयांना मायदेशी आणलं आहे.
यामध्ये दोन अफगाणी खासदारांसह काही हिंदू आणि शीख अफगाण नागरिकांचा देखील समावेश आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं. तीन वेगवेगळ्या विमानांतून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यात आले. याशिवाय १४६ भारतीय अफगाणिस्तानातून दोहामध्ये आणण्यात आले, त्यानंतर रविवारी रात्री मायदेशी हे नागरिक आपल्या मायदेशी परततील अशी माहिती कतारमधील भारतीय दूवतासाने दिली आहे.
दरम्यान भारताने व्यावसायिक उड्डाणेही सुरू केली आहेत. भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानातून आपल्या एक हजाराहून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे. आता भारतातील काही मोजकेच नागरिक अफगाणिस्तानात आहेत. त्यापैकी बहुतेक नागरिक काबुलपासून खूप दूर राहत आहेत.
अशा काही नागरिकांनी अफगाणिस्तानातील गुरुद्वारांमध्ये आश्रय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले… अमेरिकन विमानेही तेथून आपल्या नागरिकांना आणि त्यांच्या सैनिकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. रविवारी अमेरिकेने आपल्या 169 नागरिकांना तेथून बाहेर काढले आहे.
असे असूनही, तेथे अजूनही मोठ्या संख्येने अमेरिकन नागरिक आहेत. याबाबत माहिती देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले, त्यांचे हजारो नागरिक अफगाणिस्तानातून परतण्याची वाट पाहत आहेत. आपल्या शेवटच्या नागरिकाला सुखरूप परत आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.