अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला लस मिळत नाही तोपर्यंत भारत कोविडमुक्त होणार नाही, असा इशारा एम्सच्या मेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. नवीत विग यांनी दिला आहे.
शुक्रवारी भारतात एकाच दिवसात एक कोटी लसीकरण पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ. विग म्हणाले, एकाच दिवसात एक कोटी लसीकरण होणे हे मोठे पाऊल आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण होईल, असा मला विश्वास वाटतो. संपूर्ण देशाचे लसीकरण होणे गरजेचे आहे.
त्यासाठी जनतेने आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये, प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे असून कोरोनाला हारवण्यासाठी लस घेण्याचा सल्लाही त्यांनी जनतेला दिला. शुक्रवारी देशात एक कोटी लोकांचे लसीकरण पार पडले.
भारताच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले आहे. ट्विटद्वारे पंतप्रधान म्हणाले, विक्रमी लसीकरण झाले.
एक कोटी लोकांचे लसीकरण होणे हे मोठ पाऊल आहे. यामध्ये ज्यांनी लस घेतली आणि ज्यांनी लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी काम केले या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे.