अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ हजार ९७५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात नवे ५३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

दिवसभरात ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नगर शहर व जिल्ह्यात नऊ जुलैपासून सातत्याने नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी ५३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर पोर्टलवरील नोंदीनुसार दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू कोणामुळे झाला आहे.

मंगळवारी नगर जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ९९८ कोरोना मृत्यूची नोंद झाली होती, तर बुधवारी ६ हजार ७ मृत्युची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये ७४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११७ आणि अँटीजेन चाचणीत ३४७ रुग्ण बाधित आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७४, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११७ आणि अँटीजेन चाचणीत ३४७ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४,

नगर तालुका ४, नेवासा ३, पारनेर १७, पाथर्डी १७, राहुरी २, संगमनेर १४, श्रीरामपूर १ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24