अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-करोना लसीकरणाला सुरूवात झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 227 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.
आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर, वयोवृध्द (60 वर्षावरील) आणि आता 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. यातच देशात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील ४५ वर्षावरील नागरिकांना सरसकट लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर काल पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील 5 हजार 83 जणांनी करोनाची लस टोचून घेतली.
काल दिवसभरात जिल्ह्यातील 165 लसीकरण केंद्रात 11 हजार नागरिकांना करोनाची लस टोचण्यात आली. काल दिवसभरात जिल्ह्यातील 11 हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. सर्वाधिक लस ही 45 ते 60 वयोगटातील नागरिकांनी घेतली.
5 हजार 83 जणांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला, तर ४३ जणांनी दुसरा डोस घेतला. 257 आरोग्य कर्मचार्यांनी काल करोनाचा पहिला तर 231 कर्मचार्यांनी करोनाची दुसरी लस टोचून घेतली.
फ्रंट लाईन वर्कर असणार्या 631 जणांनी पहिला तर 220 जणांनी काल करोनाचा दुसरा डोस घेतला. 60 वर्षावरील 4 हजार 260 ज्येष्ठ नागरिकांनी करोनाची काल पहिली लस घेतली तर 266 वृध्दांनी काल दिवसभरात दुसरा डोस घेतला.