अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- शासकीय नियम धाब्यावर बसवून विनामास्क बेलापूर गावात फिरणाऱ्यांकडून तसेच ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरु ठेवणाऱ्या तीन दुकानदारांकडून पोलिसांनी तीस हजारांचा दंड वसुल केला आहे,
अशी माहिती पो. हे. कॉ. अतुल लोटके यांनी दिली. गाव परिसरात मोठया संख्येने कोरोना रुग्ण वाढत असताना आणि शासकीय निर्बंध कडक असूनही गावात ठिकठिकाणी टोळक्याने काहींजण अकारण विनामास्क बिनधास्त वावरत आहेत.
गावाची कोरोना दक्षता समितीही याबाबत फारशी क्रियाशील दिसत नाही. अशा स्थितीत त्यांना कोणी रोखायचे?
असा सवाल सुज्ञ आणि ज्येष्ठ नागरिक करीत आहेत याबाबत स्थानिक ग्रामप्रशासन आणि पोलिसांनी अधिक सतर्क राहुन अकारण होणारी गर्दी कमी करण्याची आवश्यकता आहे.
अन्यथा कोरोनाचा आणखी वेगाने फैलाव होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.